देवरुख /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कालपासून सुरु झालेल्या सेवा सप्ताहात संगमेश्वर तालुका भाजपने आज सलग दुसऱ्या दिवशी विविध उपक्रम राबवले.
आज सकाळी केशवसृष्टी परिसरात ७० झाडांचे रोपण करण्यात आले. यासाठी स्थानिक युवा मंडळाचे सहकार्य लाभले. यानंतर मातृमंदिर देवरुखच्या गोकुळ अनाथालयातील विद्यार्थिनीना एक महिना पुरेल एव्हढे अन्नधान्य देण्यात आले. यानंतर कोविड सेंटर देवरुखमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उपयुक्त किटचे वाटप करण्यात आले. यानंतर देवरुख तहसील कार्यालयात ॲटोमेटिक हॅंड सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आला. दुपारच्या सत्रात ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
या सर्व कार्यक्रमांना तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी तालुकाध्यक्ष नामदेव बने, मुकुंद जोशी, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, नगराध्यक्ष सौ मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशान्त मुळ्ये, अभिजीत शेट्ये, युवा नेते भगवतसिंग चुंडावत, कुंदन कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम, तालुकाध्यक्ष राजेश गवंडी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कोमल रहाटे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.