यंदा गरबो घुमणार की नाही ?नवराञौत्सवावरही कोरोनाचे सावट..

यंदा गरबो घुमणार की नाही ?नवराञौत्सवावरही कोरोनाचे सावट..

देवरुख /-

अधिक मासामुळे नवराञौत्सवही पुढे गेला आहे. महिनाभरावर होणारा हा नवराञौत्सव होणार की नाही गरबा घुमणार की नाही याबाबत साशंकता आहे.

देवरुख परीसरात गुजराती बांधवांचा शारदीय नवराञौत्सव परंपरेने चालत आलेला आहे. यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच शांततेत व नियम अटी पाळुन हा उत्सव साजरा होणार की नाही याबाबत शासनस्तरावर अजुन निर्णय झाला नाही. यामुळे दुर्गामातेची मूर्ती तयार करायची की नाही याबाबत संभ्रम आहे. यासाठी लवकर निर्णय झाला तर मूर्तीकारांना बरे पडणार आहे.

देवरुख येथे गुजराती बांधवांबरोबरच विविध ठिकाणी नवराञौत्सव साजरा होतो. देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरात प्रहर व विविध कार्यक्रम होत असतात यंदा माञ अजुन नियोजन झालेले नाही. साडवली सह्याद्रीनगर मिञमंडळाचा नवराञौत्सवही जोरदार साजरा होतो यंदा माञ बंधने पाळुन लहान मूर्ती आणुन उत्सव साजरा होण्याची शक्यता आहे.
मैञी परीसर कांजिवरा , अमृतनगर मिञमंडळ, वरची आळी मिञमंडळ येथेही यंदा गरबा होणार की नाही याबाबत नियोजन झालेले नाही.

शासनाने लवकरात लवकर नवराञौत्सवाची नियमावली जाहीर करावी जेणेकरुन तशी तयारी करता येईल असे सर्वच मंडळींचे मत आहे.यंदा कोरोनामुळे नवरोञौत्सवात तरुणाईला दांडीया गरबा खेळता येणार नाही असेच चिञ सध्यातरी दिसत आहे.मूर्तीकार अप्पा साळसकर यांनीही अजुन कोणी मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले.

सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापु गांधी यांनी याबाबत बोलताना मंदिरात पुजा विधी होतील तसेच नियम पाळुन फक्त प्रहर नियोजन करावे लागणार आहे यासाठी दोन दिवसात बैठक होणार आहे.त्षापुर्वी शासनाचे नियम कळले तर बरे होणार आहे असेही गांधी म्हणाले.

अभिप्राय द्या..