कोकणातील पूरग्रस्तांना<br>कोकणस्थ (सं) वैश्य समाजाची मदत

कोकणातील पूरग्रस्तांना
कोकणस्थ (सं) वैश्य समाजाची मदत

 

शालेय साहित्य आणि रोख मदतीचे प्रत्यक्ष वाटप..



मुंबई /-

रोजी कोकणावर कोसळलेल्या अस्मानी संकटात कोकणातील आणि त्यातही महाड, चिपळूण, खेड येथील कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोठ्या कष्टाने ऊभारलेले संसार, पिढ्यानपिढ्या राबून स्थिरावलेले व्यवसाय पाण्यात गेले. या परिस्थितीत येथील नागरिकांना आणि समाजबांधवांना पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हातभार लावण्याच्या उद्दिष्टाने कोकणस्थ (सं) वैश्य समाजाने महाड, चिपळूण आणि खेड येथे प्रत्यक्ष भेटी देत येथील पूरग्रस्त कुटुंबांना आणि व्यापारी ज्ञातीबांधवाना मदत केली.
 
कोकणस्थ (सं) वैश्य समाजाच्या पुढाकाराने मुंबईतील इतर ज्ञातीसंस्था मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघ, वैश्य सहकारी बँक, एम. व्ही. टी. व्ही पतपेढी, वैश्य विद्यावर्धक, माऊली मित्र मंडळ, महाराष्ट्र जनता सहकारी पतपेढी आणि या संस्थांशी संलग्न वैश्य बांधवांच्या सहकार्याने
‘कोकण पुरग्रस्त वैश्य ज्ञातीबांधव कर्तव्यनिधी’ उभारण्यात आला. हा निधी या संस्थांच्या प्रतिनिधी मंडळांनी १७ आणि १८ ऑगस्ट २०२१ रोजी पूरग्रस्त भागांना भेट देत वितरीत केला. शालेय साहित्य, घरगुती वस्तू आणि २००० रुपये रोख रकमेच्या स्वरूपातील ही मदत ५०० कुटुंबांना सुपूर्द करण्यात आली. महाड, चिपळूण आणि खेड येथे छोटेखानी कार्यक्रमांमध्ये ही मदत गरजूंना देण्यात आली.
 
कोकणस्थ (सं) वैश्य समाजाचे श्री भाई शेट्ये,  सौ जागृती गांगण, श्री प्रदीप गांगण, सौ मेघना थरवळ, मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाचे श्री नंदकुमार हेगीष्टे, प्रकाश साडविलकर, माऊली मित्र मंडळाचे पर्शुराम वायकूळ, गोपीनाथ नारकर, संजय गांगण, संजय कोळवणकर, नितीन कोलगे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे मदत वितरण झाले.
 
कोकणस्थ (सं) वैश्य समाज ही १३४ वर्षे जुनी सामाजिक संस्था असून ज्ञाती बांधवांबरोबरच समाजातील विविध घटकांच्या उन्नती आणि मदतीसाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत, निराधार महिलांसाठी दरमहा आर्थिक सहाय्य, मुलांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत हे स्थायी उपक्रम राबविले जातात. नैसर्गिक आपत्ती, २६/११चे बॉम्बस्फोट, कोविड-१९ साथरोग अशा विविध संकटांच्यावेळी संस्था कर्तव्यबुद्धीने सामाजिक कार्यात सहभागी झाली आहे. 

अभिप्राय द्या..