आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांचा आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांचा आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आज आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी कार्यकारणी सहित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुडाळ येथे जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान आमदार शेखर निकम हे आज पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत आज अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, कणकवली नगरसेवक अबिद नाईक, प्रदेश संघटक काका कुडाळकर, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, भास्कर परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..