माझे कुटुंब -माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी

माझे कुटुंब -माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी

परुळे /-

माझे कुटुंब – माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासनाने कोविड १९ नियंत्रीत करणे तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” ही मोहीम सुरु केली असुन ही मोहीम *दि. १५/०९/२०२० ते दि. १५/१०/२०२० या कालावधीत गावामध्ये राबविली जाणार आहे. या अंतर्गत *आरोग्य सेवक व आशा घरोघरी जावून कुटुंबातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, सर्दी खोकला आहे का याची तपासणी करणार आहेत. तरी कुणीही अशी लक्षणे असल्यास ती घाबरुन जावून दडवून न ठेवता सांगावयाची आहेत. त्यामुळे योग्य तो उपचार करणे शक्य होणार आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य उपकेंद्र परुळेबाजार व कर्ली तसेच ग्रा. पं. परुळेबाजार यांचेकडून करण्यात येत आहे.या याचाच भाग म्हणून परुळेबाजार येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच श्वेता चव्हाण उपसरपंच विजय घोलेकर ग्रामसेवक शरद शिंदे सदस्य अदिती परुळेकर आरोग्य सेविका व्ही एन धुरी आशा स्वयंसेविका कोमल मांजरेकर मदतनीस आरती परुळेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..