मुंबई /-
राज्यभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यापैकी 33 टक्के डॉक्टर मुंबईतील आहेत.
कोरोना कालावधीत कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नोंद सरकारने ठेवलेली नाही, असा खेद व्यक्त करत डॉक्टरांच्या मृत्यूची आकडेवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केली आहे.दरम्यान देशातील तब्बल 2 हजार 238 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यापैकी 382 जणांचा मृत्यू झाला आहे.