मुंबई /-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे.
अंतिम वर्षांची परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी दिले. आयोगाच्या 6 जुलैच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांना ही परीक्षा प्रक्रिया 30 सप्टेंबपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते.परीक्षा सुरू असतानाच मूल्यांकनाचे कामही सुरू करावे, जेणेकरून निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत जाहीर करणे शक्य होईल. निकाल वेळेत जाहीर झाल्यास पुढील प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरू करता येईल,’ असे आयोगाने म्हटले आहे.