You are currently viewing सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

सावंतवाडी /-

सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. या पदी कार्यरत असलेल्या गजानन पानपट्टे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मदन क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान क्षीरसागर यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यातील काही महत्त्वाच्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनक्षेत्रपाल यांच्यासमोर मांडल्या. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील होणारी अवैद्य कामं बंद व्हावीत तसेच अवैध लाकूडतोड बंद व्हावी, जंगली प्राण्यांचे सर्वतोपरी संरक्षण व्हावे, जंगलातील अवैध शिकार करणाऱ्यांवर नजर ठेवून योग्य ती कारवाई करावी, सावंतवाडी तालुक्यातील निसर्ग आणि नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व्हावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली.

अभिप्राय द्या..