NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे उल्लेखनीय यश..

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे उल्लेखनीय यश..

वेंगुर्ला /-
एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे ९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.तृषा सचिन वारंग, हर्षाली सुहास परुळेकर,मंदार प्रसाद मुंडये,हर्षाली रुपेश राणे, मोहित विनय आजगावकर व सानिका बाबुराव लांबर या सहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.या सहा विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये प्रमाणे नववी ते बारावी पर्यंत प्रत्येकी एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका रीमा ठाकूर, महेश चव्हाण,तेजश्री सावंत,गंगा वैद्य व सोमनाथ बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेचे मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..