You are currently viewing परवाना नसताना लाकूड पळवून वाहतूक नेल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील एकाला अटक…

परवाना नसताना लाकूड पळवून वाहतूक नेल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील एकाला अटक…

दोडामार्ग /-

सरकारी कामात अडथळा आणणे आणि विनापरवाना लाकूड वाहनासह पळवून नेल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी उगाडे येथील एकाला आज अटक केली. काही दिवसांपुर्वी तळकट परिसरात शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोघांना अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच उगाडेत अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उगाडे येथे ड्युटीवरील वनपालाला गुंगारा देत विनापरवाना लाकूड आणि वाहन (ट्रक) पळवून नेल्याप्रकरणी उगाडे येथील अंकुश गुरुनाथ नाईक याला दोडामार्ग पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे.

अभिप्राय द्या..