झाराप पत्रादेवी आयशर आणि डंपरमध्ये अपघात चालक गंभीर.;थांबलेल्या डंपरला दिली धडक..

झाराप पत्रादेवी आयशर आणि डंपरमध्ये अपघात चालक गंभीर.;थांबलेल्या डंपरला दिली धडक..

सावंतवाडी /-

झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयशर कंटेनरने समोरील डंपरला जोरदार धडक दिली. यात आयशर कंटेनर ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी सावंतवाडी येते पाठवले आहे. दरम्यान अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी महामार्ग पोलीस एपीआय अरुण जाधव, हवालदार गोसावी, चिंदरकर, नाईक, करवंदे, काबळे, पाटील, बुथेलो, उपस्थित होते.

अभिप्राय द्या..