माध्य. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तसेच राज्यातील माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले.
यामध्ये बीडीएस प्रणाली तात्काळ सुरु करा, घोषित अघोषित विनाअनुदानित माध्यमिक -उच्च माध्यमिक तुकड्यांना अनुदान द्या, शाळा तिथं मुख्याध्यापक पद मंजूर करा, शालार्थ आयडी संगणक प्रणाली त्वरित रद्द करा, ड्युटीवर असताना कोवीड आजाराने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी ला घ्या!, अध्यापन कारण्यासाठी शिक्षकांना कोवीड ड्युटीतुन वगळावे, नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी 4 जानेवारीचा शासन निर्णय त्वरित लागू करावा. लेखापरीक्षकांचा वाढता हस्तक्षेप व चुकीच्या पद्धतीवर निर्बंध घाला, अशा एकूण १५ विविध मागण्यासंदर्भात क्रांती दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने जि. प. सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात करीत लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या आंदोलनात सी. डी. चव्हाण, माणिक पवार, गोविंद सारंग इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर उपस्थिती संदर्भात ठोस निर्णय घ्यावा

शिक्षक भारतीच्यावतीने आज जि. प. सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर दुसरेही लाक्षणिक धरणे आंदोलन जिल्हा सचिव सूरेश चौकेकर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले. जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांची उपस्थितीबाबत शिक्षणाधिकारी यांनी ठोस निर्णय घ्यावा व एकवाक्यता आणावी यासाठी आज आंदोलन हे छेडण्यात आले.
या आंदोलन शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, संघटक समीर परब, उपाध्यक्ष जनार्दन शेळके, राज्य प्रतिनिधी सी. डी. चव्हाण, डी. बी. कांबळे, गोविंद सारंग, दत्ताराम जाधव, देवेंद्र सावंत, आनंदा जाधव, हेमंत सावंत, प्रसाद मसूरकर, स्वप्निल पाटील, अमर राठोड, निलेश राठोड व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page