कुडाळ /-


‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन जमियत उलेमा ए हिंद, सिंधुदुर्ग द्वारे सोमवारी, ९ ऑगस्टला महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

कुडाळ येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रतिथयश उद्योजक श्री. कौसर खान यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कोरोना साथरोगाच्या काळात अविरत आरोग्य सेवा पुरविणारे डॉक्टर गौरव घुर्ये, डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर नागेश पवार, डॉक्टर इम्रान नदाफ यांचा सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी चे उपस्थित डॉक्टर आणि कर्मचारी यांचादेखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास कुडाळ तहसीलदार माननीय श्री. अमोल पाठक यांनी सदिच्छा भेट दिली आणि उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. मनसे जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब, श्री जगन्नाथ नाडकर्णी यांनीदेखील शिबिरास सदिच्छा भेट दिली. जयभीम युवक मंडळाचे पदाधिकारी श्री. विद्याधर कुडाळकर आणि सहकाऱ्यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

या रक्तदान शिबिरात एकूण 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा रक्तपेढी द्वारे सन्मान चिन्ह देऊन जमियत उलेमा ए हिंद च्या उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री. हाफीज झैद, श्री. मुबीन दोस्ती, श्री. फारूक दोस्ती, श्री. सरफराज नाईक, श्री. इरफान करोल, श्री. अय्याज दोस्ती, श्री. रिझवान मणियार, नियाज शहा, श्री. मुश्ताक शेख, श्री. जफर जमादार, जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल सत्तार बगदादी, जिल्हाउपाध्यक्ष श्री. शफीक खान आदींचे सहकार्य लाभले.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमीवर रक्तपेढीमध्ये रक्ताची सतत आवश्यकता असल्याने जमियत उलेमा ए हिंद, सिंधुदुर्ग द्वारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जात असुन यापुढे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असुन रक्तदान चळवळीद्वारे राखीव रक्तदाता गट देखील तयार केला जात आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने माजी नगरसेवक श्री. एजाज नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page