कुडाळ /-

सुदृढ व सक्षम पिढी तयार होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली,पाहिजे मातांनी आपल्या मुलासह स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन डॉ प्रियांका गौरव घुर्ये यांनी केले ,शुक्रवारी 6 ऑगस्टला तालुका स्कूल येथे स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनदा माता व गरोदर स्त्रिया यांच्यासाठी मार्गदर्शनपर शिबीर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यावतीने आयोजित केले होते. यामध्ये जवळपास 10 स्तनदा माता आणि 25 अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी डॉ प्रियांका घुर्ये यांनी सुदृढ व सक्षम पिढी तयार होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, कोणती तयारी केली पाहिजे शारीरिक व मानसिक, कोणत्या गोष्टींचे समुपदेशन घेतले पाहिजे, तसेच स्तनदा मातांनी बाळासाठी त्यांचा आहार, विहार, व्यायाम कसा असला पाहिजे आणि बाळाची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे यावर उत्तम रीतीने उदाहरणांसहित सविस्तरपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी लायन्स अध्यक्ष अस्मिता बांदेकर, जयंती कुळकर्णी, शोभा माने, देविका बांदेकर, मेघा सुकी शाळेचे मुख्याध्यापक आनंद नवार शैलजा कांबळी मानसी वर्दम दीपाली पठाणी दीपिका साटम अक्षता जाधव चित्रा मयेकर श्रीमती शिंदे नीता पवार सरिता घाडी प्रभावती घडी रत्नप्रभा खानोलकर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्या स्तनदा माता येऊ शकल्या नाहीत त्यांच्यापर्यंत ही सर्व माहिती व मार्गदर्शन अंगणवाडी ताईमार्फत पोचवले जाईल असे त्यांच्या वतीने शैलजा कांबळी यांनी सांगितले. उपस्थित लाभार्थ्यांना गुळ आणि शेंगदाणे ज्यामध्ये लोह प्रथिने व जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात त्याचे वाटप करण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनदा माता व गरोदर स्त्रिया यांच्यासाठी मार्गदर्शनपर शिबीराचे उद्घाटन करताना अस्मिता बांदेकर डॉ प्रियांका घुर्ये व ईतर पदाधिकारी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page