प्रांत कार्यालयानजीक घराची भिंत कोसळून नुकसान..

प्रांत कार्यालयानजीक घराची भिंत कोसळून नुकसान..

सावंतवाडी /-

प्रांत कार्यालय येथील एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. प्रांत कार्यालयासमोर असणाऱ्या झाडाच्या फांद्या त्या घरावर आल्या आहेत. त्यामुळे त्या घरावर मोठ्या प्रमाणत पाला पाचोळा पडल्याने त्या घराच्या भिंतीवर पावसाळ्यात पाणी झिरपत होते. त्यामुळे त्या घराच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या. गेल्यावर्षी याबाबत नगरसेविका दिपाली सावंत यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पाठ पुरावा करून त्या घरावरील फांद्या तोडून घेतल्या होत्या. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाने नगरपालिकेने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

अभिप्राय द्या..