You are currently viewing गुरुनाथ गुरव यांना आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार जाहीर…

गुरुनाथ गुरव यांना आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी /-

दरवर्षीप्रमाणे १ ऑगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महसूल अधिकारी कर्मचारी वर्गाला सन्मानित करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचे सुपुत्र आणि आंबोली मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गुरुनाथ गुरव यांना या वर्षीचा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्ला तहसिलदार लोकरे, दोडामार्ग तहसिलदार खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुनाथ गुरव यांना २०१९-२०२० मध्ये जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी तर २०२१-२०२१ यावर्षी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते असे सलग दोन वेळा आदर्श पुरस्काराने,सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..