साटेली भेडशीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक देत केली कारवाई…

साटेली भेडशीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक देत केली कारवाई…

सुसाट सुरू असलेले दारूअड्डे देखील बंद करा साटेली-भेडशी वासीयांची मागणी..

दोडामार्ग /-

साटेली भेडशी येथे राजरोसपणे रात्री अपरात्री सुरू आलेला मटका,दोडामार्ग पोलिसांनी धडक देत साटेली भेडशी बाजारपेठेत धाड टाकून अवैध चाललेला मटका जुगार खेळ बंद पाडला, दोडामार्ग पोलिसांनी दोन ठिकाणी ही कारवाई केली. या कारवाईत रोख ३०२५ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी संजय संतोष नाईक व प्रभाकर राघोबा राणे या दोघांना अटक केल्याची माहिती दोडामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. या बाबत अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देसाई करत आहेत. या कारवाई मुळे साटेली भेडशी मधील वासीयांन कडून पोलीसांच्या या कामाचे मोठ्या पध्दतीने कौतुक देखील केले जात असून साटेली भेडशी येथे सुसाट सुरू असलेले दारूअड्डे देखील बंद करा अशी मागणी साटेली भेडशी वासीयांकडून होत आहे.

अभिप्राय द्या..