मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम.;पोसरेतील आपद्ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत!

मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम.;पोसरेतील आपद्ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत!

मसुरे /-

खेड तालुक्यातील पोसरे गावातील बौद्धवाडीवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील पोसरे गावातील सात कुटुंबातील एकूण १७ माणसे ढिगार्‍याखाली मृत्युमुखी पडली होती. बांधवांन वर आलेल्या संकटात माणुसकी जपण्यासाठी मालवण तालुक्यातील बौद्ध सेवा समीतीच्या वतीने आर्थिक मदत पोसरे येथे जात करण्यात आली. यावेळी राजेंद्र कदम,हेमंत कदम,सहास कदम,अनिल किर्लोस्कर, आनंद तांबे यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून आर्थिक योगदान दिले. वस्तू रूपाने मदत भरपूर प्रमाणात जमा झाली आहे. त्यांची आर्थिक स्थिती खूप हलाखीची बनलेली आहे. हे प्रत्यक्ष सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी अनुभवलं. ज्यांना शक्य असेल त्यांनी निश्चितपणे या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करावा. आणि भेदरलेला स्थितीत असलेल्या कुटुंबांना सावरण्याचं बळ द्यावे असे आवाहन राजेंद्र कदम यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..