वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आणखीन १ म्हैस मृत्युमुखी १ जखमी

वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आणखीन १ म्हैस मृत्युमुखी १ जखमी

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील कॅम्प
वडखोल धावडेश्वर मंदिर नजिक येथील तुटून चिखलात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका म्हैशीचा मृत्यू झाला आहे.तर एक म्हैस जखमी झाल्याने तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.येथील
भालचंद्र भास्कर सावंत यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीचा शनिवारी सकाळी ९.३० वा. विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला.याबाबत माहिती मिळताच वायरमन किशोर मोर्ये,साहिल गावडे यांनी त्वरित वीजपुरवठा खंडित केला.वीज वितरण सहाय्यक अभियंता, सर्कल यांनी त्वरित भेट देत पंचनामा केला. संबंधित शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने अन्य गुरांना इजा पोहचली नाही.दरम्यान २ दिवसात तालुक्यातील २ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

अभिप्राय द्या..