“मालवण वीज वितरण मध्ये अरुण फोंडेकर यांची मोलाची कामगिरी”.; गणेश साखरे

“मालवण वीज वितरण मध्ये अरुण फोंडेकर यांची मोलाची कामगिरी”.; गणेश साखरे

चौके /-

गेली ४० वर्षे वीजवितरण मध्ये प्रामाणिक निस्वार्थी सेवा देणारे मालवण वीजवितरण मधील वरिष्ठ तत्रंज्ञ अरुण वसंत फोंडेकर हे ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. “फोंडेकर यांनी १९८० ते २०२१ या ४० वर्षात रत्नागिरी – सिधुंदूर्ग जिल्ह्यात काम करताना सुरवातीला खड्डे मारणे पोल उभे करणे ही कामे करत वायरमन ते लाईनमन काम केले. गेली ७ वर्षे चौके वीज उपकेद्रात वरीष्ठ तंत्रज्ञ पदावर महत्त्वाची कामगिरी बजावली. एखाद्या उच्च अभियंत्याप्रमाणे दिवस रात्र ग्राहकांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या फोंडेकर यांची वीजवितरणसाठी मोलाची कामगिरी ठरली.” असे भावनिक उद्गार मालवणचे कार्यकारी अभियंता गणेश साखरे यांनी फोंडेकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाप्रसंगी काढले.

यावेळी प्राजक्ता पाटील, फराज सय्यद, हितेश गायकवाड, गुरुदास भुजबळ, सुजित शिंदे, उप कार्यकारी अभियंता मालवण तालुका, पंचायत समिती सदस्य मनिषा वराडकर, चौके व्यापारी संघ अध्यक्ष नंदू राणे व्यापारी नाना देसाई, बबन आंबेरकर, नितीन गावडे, भाई गावडे, विलास आंबेरकर, सुनिल आंबेरकर, बाबु गावडे सर्व व्यापारी बांधव, चौके ग्रामस्थ, हितचितंक, वीजवितरण चे कर्मचारी उपस्थित होते.

४० वर्षाच्या कार्यकालात वीजवितरण कडून फोंडेकर यांना चांगली सेवा दिल्याबद्दल तब्बल तीन वेळा पुरस्कार मिळाले होते. अतिशय कार्यतत्पर प्रामाणिक, शिस्तबद्ध, शांत, मनमिळावू स्वभाव, निवृत्तीच्या काळातही तरुणांना लाजवेल असा कामाचा उत्साह आणि दिवस-रात्र सेवा पुरविणारे फोंडेकर यांचा शनिवार दिनांक ३१ जुलै रोजी मालवण विजवितरण, चौके, कुभांरमाठ, कट्टा विभाग, व्यापारी संघ चौके तसेच अन्य मान्यवरांच्या वतीने भेटवस्तू शाल श्रीफळ देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्तीपर सत्काराने भावनिक होत फोंडेकर यांनी आपल्या कार्याची पोचपावती आजच्या सत्कारातुन मिळाली असे सांगत सर्वांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..