You are currently viewing पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला श्वास…

पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला श्वास…

सावंतवाडी /-

शहरात आज काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे देखील दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी येथील बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते जयानंद मठकर यांचे सहकारी अशोक बांदेकर यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाला काही तास होत नाहीत तोच त्यांच्या पत्नी सूनिता बांदेकर यांचे देखील निधन झाले आहे. काही तासातच पती पत्नीचे निधन झाल्याने सावंतवाडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..