..अखेर मालवण मधील तो धोकादायक विजेचा पोल बांधकाम सभापती यतीन खोत यांनी हटवीला..

..अखेर मालवण मधील तो धोकादायक विजेचा पोल बांधकाम सभापती यतीन खोत यांनी हटवीला..

मालवण /-

मालवण शहरातील धुरीवाडा साई मंदिर ते पिंपळपार मार्गावर बरेच वर्षे धोकादायक अवस्थेत असलेला वीजेचा पोल अखेर हटवण्यात आला आहे. पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. याबाबत येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

या धोकादायक पोलामुळे येथे अपघाताची भीती होती. याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार श्री. खोत यांनी वीज वितरण विभागाकडे पाठपुरावा करून हा वीज पोल बदलून घेतला. याबाबत नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी समीर शेख, गणेश चिंदरकर, बबन परूळेकर, हेमंत पाडावे, दीपेश पवार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..