मालवण मद्धे विविध विभागांचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

मालवण मद्धे विविध विभागांचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

मालवण /-

कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण तहसील कार्यालयात दक्षता समितीची आढावा बैठक घेतली.त्याचबरोबर मालवण पंचायत समितीची आढावा बैठक,कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य यंत्रणेचा आढावा, महावितरण विभाग, नगरपालिका, कृषी विभाग, शिक्षण विभाग,आदी विभागांचा तसेच २५/१५ अंतर्गत मंजूर कामांचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी आवश्यक सर्व सूचना आ.वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
मालवण दक्षता समिती बैठकीस तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार श्री.खरात, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,दक्षता समिती सदस्य मंदार केणी,गणेश कुडाळकर,दीपक देसाई,आतू फर्नांडिस बाबू डायस,सुनीता जाधव, नंदा सारंग, रश्मी परुळेकर, किसन मांजरेकर,सभापती अजिंक्य पाताडे,
पंचायत समिती मालवण येथे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी, सहाय्यक गटविकास अधिकारी एस आर चव्हाण, गट शिक्षणाधिकारी माने, श्री पाटगावकर, श्री चौगुले,श्री घेवाळे, अतुल माने, कृषी अधिकारी संजय गोसावी, विस्तार अधिकारी के.टी.पाताडे,व्ही के जाधव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..