मालवणात आज ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

मालवणात आज ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

मालवण / –
येथील ग्रामीण रुग्णालयात आज करण्यात आलेल्या तपासणीत ११ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शहरात ५ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
आज ग्रामीण रुग्णालयात ४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील डॉक्टर दांपत्य, एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. शहरातील गवंडीवाडा येथील १, मेढा येथील १, धुरीवाडा येथील १, पालिकेसमोर २, मसुरे येथील १, कुंभारमाठ येथील ४, कुडाळ येथील १ रुग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..