मालवणला सराफी पेठ आठवडाभर बंद..

मालवणला सराफी पेठ आठवडाभर बंद..

मालवण/

मालवण शहर आणि तालुक्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मालवण सुवर्णकार संघाच्या वतीने बुधवार दि. १६/०९/२०२० ते बुधवार दि. २३/०९/२०२० पर्यंत मालवण शहरातील सराफी पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदरचा निर्णय सध्याच्या काळात बैठक घेऊन करणे शक्य नाही. तरी सर्व सुवर्णकार बंधूंनी दुकाने बंद ठेऊन सहकार्य करावे. असे आवाहन मालवण सुवर्णकार संघ अध्यक्ष अनिल मालवणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..