दिपक कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुन्हा निवड

दिपक कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुन्हा निवड

आचरा /-

सिने-नाट्य दिग्दर्शक दिपक दत्ताराम कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी पुन्हा निवड झाली आहे . याबाबत केंद्रीय मानवाधिकार संघटन राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवाले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सिनेसृष्टीतून अभिनंदन केले जात आहे.
दिपक कदम यांचे सिने-नाट्य क्षेत्रातील काम हे कौतुकास्पद आहे.त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका, जाहिरात इत्यादी क्षेत्रात काम करताना सामाजिक बांधीलकी म्हणून आपल्या प्रत्येक कलाकृतीतून सामाजिक सलोखा कसा वाढेल हेच पाहिले.आताच त्यांनी कोविड 19 साठी लॉक डाउन मध्ये गरजू आणि कलावंतांना मदतीचा हात दिला त्यांनी लोक कलाकार संघटित होऊन त्यांच्या न्याय हक्का साठी एक संस्था असावी असा विचार करून देशातील अनेक लोक कलावंत सहकलाकार तंत्रज्ञ एकत्र यावेत हा विचार केला.

२००९ पासून त्यांनी आतापर्यंत 20 मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे…त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून अनेक पुरस्कार मिळाले आहेत… *पूरषा* या त्यांच्या चित्रपटाला आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून कोकणात मालवणी भाषे मध्ये चित्रित केलेली ही फिल्म आहे फिल्म अनेक देशी विदेशी फेस्टिवल साठी पाठवली आहे तसेच
त्यांनीच निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ‘वाक्या’ या मातंग समाजातील एका पोताराजाच्या जीवनशैलीवर आधारित असलेल्या चित्रपटाला आतापर्यंत तब्बल १३ पुरस्कार मिळाले आहेत…त्यांच्या या सामाजिक आणि कलाक्षेत्रातील योगदानाची नोंद घेऊनच दिपक कदम यांची निवड राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून केली आहे असे मिलिंद दहीवले (राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली ) यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे…दिपक कदम यांचे सिनेसृष्टीतून कौतुक व अभिनंदन होत आहे…

अभिप्राय द्या..