रत्नागिरी /-
शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला पोहचला असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन आला आहे. ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हा धमकीचा फोन उदय सामंत यांच्या पीएच्या फोनवर आला असून असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणारच, असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत या धमकीची तातडीनं तक्रार करणार आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना देखी असा धमकीचा फोन आला होतं.