You are currently viewing जि.प.सदस्य प्रदिप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये शिवसेना जि.प. सदस्य होणार सामील.;गटनेते नागेंद्र परब यांची माहिती

जि.प.सदस्य प्रदिप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये शिवसेना जि.प. सदस्य होणार सामील.;गटनेते नागेंद्र परब यांची माहिती

सिंधुदुर्ग /-


ठिय्या आंदोलनाबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे
गेल्या 4 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वनिधी अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वच विरोधी पक्षांतील सदस्यांवर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी जि.प. विभागातील नागरिकांकडून मागणी झालेल्या विकास कामांची मागणी जि.प.कडे करून सुद्धा त्याकडे दुर्लक्षच करण्यात आलेले आहे व अतिशय चुकीच्या पद्धतीने मंजूरीची प्रक्रिया राबवून विकास कामे करण्यात आलेली आहेत.यासंदर्भात माननीय जी प सदस्य प्रदीप नारकर यांनी माननीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली असता,त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन सुद्धा त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही,जि प सर्वसाधारण सभेमध्ये सदर प्रश्न उपस्थित करूनसुद्धा त्यावर काहीच उत्तर मिळत नाही.त्यामुळे विकास कामांना निधी देताना सदस्यांवर अन्याय होत आहे ही आम्हां सर्वच शिवसेना जि.प.सदस्यांची भावना आहे.
त्यामुळे सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी जि.प.सदस्य प्रदिप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये आम्ही शिवसेना जि.प. सदस्य सामिल होणार आहोत.अशी माहिती जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी दिली

अभिप्राय द्या..