आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते घोटगे, सोनवडे, कुपवडे, भरणी, जांभवडे गावांमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते घोटगे, सोनवडे, कुपवडे, भरणी, जांभवडे गावांमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

कुडाळ /-

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने घोटगे बाजारपेठ येथे घोटगे, सोनवडे, कुपवडे, भरणी , जांभवडे या गावांमधील कोरोना योद्ध्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये आशासेविका, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, वायरमन यांना सन्मानपत्र, भेटवस्तू, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कोरोना कालावधीत सर्व कोरोना योद्ध्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे आज आपण कोरोना संकटावर हळुहळु मात करीत आहोत.त्यांच्या कामगिरीचा गौरव शिवसेनेच्या माध्यमातून केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील आपल्या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन मेडिकल कॉलेजला तसेच त्यासाठी आवश्यक निधीला मंजुरी दिली.कोविड लॅब देण्यात आली. ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले.कुडाळ महिला बाल रुग्णालय तसेच आरोग्याच्या दृष्टीने अन्य सोयी सुविधा जिल्ह्यासाठी देण्यात आल्या. तौकते चक्रीवादळ नुकसान भरपाई देण्यात आली आहे.मतदार संघातील प्रत्येक गावागावात विकास कामासाठी निधी दिला जात आहे.असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, संजय गांधी निराधार योजना समीती अध्यक्ष अतुल बंगे, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, उपविभाग प्रमुख राजू परब, युवासेना उपविभागप्रमुख समीर गावकर, शाखा प्रमुख गुरू मेस्त्री, अविनाश नाईक, तेजस भोगले, गणपत घोगळे, सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, भरणी सरपंच प्रिया परब, चंदन ढवण, वामन गुरव, बापू मेस्त्री, भावेश परब, बाबू ढवळ, दीपक घाडी, रूपेश घाडी आदिंसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..