You are currently viewing दोडामार्ग मधील पाळये गावातील पूल गेले वाहून…

दोडामार्ग मधील पाळये गावातील पूल गेले वाहून…

दोडामार्ग /-

सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाळये गावातील मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेले असून गावाचा बाजारपेठेशी असलेल्या संपर्क तुटला असता कामानिमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात तारांबळ उढाली आहे,तर यामुळे पाळये गावाचा अनेक गावांशी असलेला संपर्क देखील तुटलाय.
गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असता, दोडामार्ग शहरा पासून वीस किलोमीटर लांब असलेल्या पाळये गावातील मुख्य रस्त्यावरील चक्क पूलच वाहून गेल्याने गावाचा बाजारपेठेशी व अन्य गावांशी असलेला संपर्क तुटला असून गाववासीयांची मात्र तारांबळ उढाली आहे, त्यातच कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना घरी जाणे शक्य नसल्याने नागरिकवर्ग मात्र मध्यच अडकल्याचे चित्र समोर येतेय, पाळये गावातील वाहून गेलेले पूल हे गावातील मुख्य रस्त्यावरील पूल असून पाळये गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून अन्यमार्ग नसल्याने गावातील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी गावा बाहेर जाणे शक्य नसल्याने गावातील नागरिक मात्र गावातच अडकून बसल्याने गाववासीयांन मध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अभिप्राय द्या..