समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली बांदा पुरग्रस्त भागाची पाहणी…

समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली बांदा पुरग्रस्त भागाची पाहणी…

दोडामार्ग /-

गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे बांदा निमजगा रस्त्यावरील बांदेकरवाडी येथील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून बांदा वासीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील नागरिकांवर पडलेल्या संकटाची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आले असता यावेळी तलाठी वर्षा नाडकर्णी उपस्थित होत्या यावेळी अंकुश जाधव यांनी तलाठी तसेच संबंधित प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई द्या कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास याचा जाब विचारला जाईल असा इशारा दिला असता तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पूरस्थितीचे नुकसान पंचनामे सोमवारी सकाळी केले जातील असे सांगितले, यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव,भाजपा युवा सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष संदिप बांदेकर, सिंधुदूर्ग जिल्हा उन्नती मंडळचे माजी अध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक भारत बांदेकर, दिपक बांदेकर, तलाठी वर्षा नाडकर्णी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..