वैभववाडी /-

भुईबावडा घाटातून सुरू असलेली अवजड वाहतूक उद्या 22 जुलै पासून बंद करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. भुईबावडा घाटात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे घाटरस्त्याला बहुतांश ठिकाणी तडे गेले आहेत. त्यातच संततधार पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भुईबावडा घाटातील अवजड वाहतुक काही काळ बंद करावी असे पत्र पिडब्ल्यूडी चे उपअभियंता प्रमोद कांबळे यांनी कणकवली प्रांताधिकारी तसेच वैभववाडी तहसीलदार यांना दिले आहे. करूळ घाटरस्ता बंद असल्यामुळे सध्या वैभववाडी तालुक्यातून भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर च्या दिशेने अवजड वाहतूक सुरू आहे. करूळ घाटरस्ता बंद असल्यामुळे जवळचा मार्ग म्हणून भुईबावडा घाटातून सध्या अवजड वाहतूक सुरू आहे. भुईबावडा घाटरस्ता बऱ्याच ठिकाणी भेगाळला असून वारंवार कोसळणाऱ्या दरडीमुळे मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे. अखेर भुईबावडा घाटरस्त्याची सध्याची दयनीय अवस्था पाहता घाटरस्त्यातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे भीषण अपघात होण्याची अथवा वाहतूक खोळंबण्याची शक्यता लक्षात घेत पिडब्ल्यूडी विभागाकडून अधिकृतपणे पत्राद्वारे कणकवली प्रांताधिकारी तसेच वैभववाडी तहसीलदार यांच्याकडे अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रांताधिकारी वैशाली राजमाने याची गंभीर दखल घेतली असून उद्या22 जुलैपासून भुईबावडा घाटमार्गातून अवजड वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page