You are currently viewing सिंधुदुर्ग – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प..

सिंधुदुर्ग – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प..

गगनबावडा- कोल्हापूर रोडवर मांडुकली येथे १ फुट आले पाणी..

वैभववाडी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील कुंभी धरणातून ४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गगनबावडा- कोल्हापूर रोडवरील मांडुकली येथे नदीचे पाणी १ फुटांपर्यंत रस्त्यावर आल्याने गगनबावडा – कोल्हापूर या मार्गावरुन होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

अभिप्राय द्या..