१९८९ च्या माजी माजी विद्यार्थी बँच कडून चौके हायस्कुलला आर्थिक मदत

१९८९ च्या माजी माजी विद्यार्थी बँच कडून चौके हायस्कुलला आर्थिक मदत

चौके /-

महिन्याभरापूर्वी आलेल्या तौक्ते वादळाने चौके पंचक्रोशीतील शिक्षणाचे मंदिर भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल चौके हायस्कुलच्या स. न. १९८९ बॅचच्या माजी विद्यार्थी वॉटसॲप ग्रूपने घेतली आणि आर्थिक मदतीचे आवाहन ग्रूपमधील सदस्यांना केले. महिनाभरात या ग्रूपने शाळेप्रती ऋण फेडण्यासाठी तब्बल साठ हजार पाचशे रुपये (६०,५००) रक्कम गोळा केली आणि त्या रकमेचा धनादेश शाळेकडे सुपुर्त केला. ग्रूप सदस्य माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हा धनादेश मुख्याध्यापक विजय गावकर तसेच सहकारी शिक्षक यांच्याकडे देण्यात आला.सदर रक्कम १९८९ एस. एस. सी. बॅचमधील माजी विद्यार्थी प्रविण राऊत, अविनाश करलकर, वैशाली गावडे (परब), शशिकांत चव्हाण, हेमंत चव्हाण, महेश तावडे, संगिता चव्हाण (सावंत), वामन तावडे, विनायक घोगळे, सुनिता गावडे (परब), सुषमा आंबेरकर (शिंदे), आनंद राऊत, प्रमोद हिंदळेकर, चंदन कांबळी, उदय सुकाळी, सुचिता सांडव, प्रविण वाक्कर, चित्रलेखा आचरेकर (करगुंटकर) यशवंत कदम, उल्हास वाक्कर, रेखा पार्सेकर (चव्हाण) सुधिर माडये, संतोष जाधव, हेमंत चव्हाण (नांदरुख), दिपशिला आंबेरकर, संध्या मायनाक यांनी आर्थिक सहकार्य केले. संस्था पदाधिकारी, शिक्षक यांच्याकडून माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

अभिप्राय द्या..