हायवेच्याच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादीकॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर यांनी वेधले जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचे लक्ष !

हायवेच्याच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादीकॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर यांनी वेधले जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचे लक्ष !

सिंधुदुर्गनगरी /-

नॅशनल हायवेच्या 66 च्या निकृष्ट कामा बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनंत पिळणकर जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधून आपल्या निवेदनात देत कोणत्या ठिकाणी निकृष्ट काम झाली हे सांगितले आहे.बऱ्याच ठिकाणी नवीन हायवेवरील रस्ता खचला आहे.या सर्व गोष्टींचा नाहक त्रास नागरीकांना होत आहे. संबंधीत ठेकेदाराची चौकशी करून संबंधी कारवाई करावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी अनंत पिळणकार त्यांच्या सोबत,जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर सोबत जिल्हा चिटणीस रुपेश जाधव ,कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर , कणकवली युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर ,अजय जाधव , देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..