मुसळधार पावसामुळे मुंबईत,पालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी.;तब्बल ४०० गाड्या पाण्याखाली..

मुसळधार पावसामुळे मुंबईत,पालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी.;तब्बल ४०० गाड्या पाण्याखाली..

मुंबई /-

दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत 30 मुबईकरांचा जीव घेतला आहे. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलं आहे. असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतील कांदिवली भागात. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या.

मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला. वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की आपण कशासाठी पैसे मोजले होते? असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार.

कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सच्या पे अॅन्ड पार्कच्या जागेत शिरलेले पाणी उपसण्याचे काम सध्या सुरु आहे. पे अॅन्ड पार्कच्या जागेत शिरलेले पाणी पंप लावून उपसण्याचं काम केलं जात आहे. लवकरच या पार्किंमध्ये शिरलेलं संपूर्ण पाण्याचा निचरा होईल, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील महानगरपालिकेच्या पार्कींगमध्ये 400 पेक्षा जास्त गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. यासर्व गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. सध्या पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

अभिप्राय द्या..