केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीला नासिर काझी,अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, संताजी रावराणे पोचले दिल्लीत..

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीला नासिर काझी,अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, संताजी रावराणे पोचले दिल्लीत..

वैभववाडी /-

भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र भाजपच्या पदाधिकारी व राणे समर्थकांनी जल्लोष साजरा केला.ना. नारायण राणे यांच्या भेटीची आतुरता लागलेल्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी खास दिल्ली दौरे काढून राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. नवीन मंत्र्यांना ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याच्या सूचना दिल्याने ना. नारायण राणे यांचा दिल्ली मुक्काम वाढला परिणामी राणे यांच्या अभिनंदनासाठी वैभववाडीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठून मंत्री नारायण राणे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच नाधवडे येथे एमआयडीसीच्या २८ एकर जागेवर प्रदूषण विरहित प्रकल्प उभारून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.या भेटीमध्ये तालुकाध्यक्ष नासिर,काझी,उपसभापती अरविंद रावराणे. जि प सदस्य सुधीर नकाशे. संताजी रावराणे , सुनील भोगले उपस्थित होते.

अभिप्राय द्या..