कोलगाव हायस्कूलमधील संगणक चोराला केले गजाआड.;५ दिवस पोलिस कोठडी..

कोलगाव हायस्कूलमधील संगणक चोराला केले गजाआड.;५ दिवस पोलिस कोठडी..

सावंतवाडी /-

कोलगाव हायस्कूल मधील संगणक चोरी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. विनोद परशुराम घणके, वय ३० (सध्या रा. कोलगाव, मूळ गाव सांगली) असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान त्याला आज सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हा चोरीचा प्रकार १३ जुलैला उघडकीस आला होता. दरम्यान संबंधित प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संबंधिताने तीन संगणक मिळून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवला होता. दरम्यान तपासाअंती संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित हा मूळ सांगली येथील असून सध्या तो कोलगाव तिठा येथे वास्तव्यास आहे. या ठिकाणी तो सेंटरचे काम करतो, अशी माहिती पोलीस महेश पास्ते यांनी दिली.

अभिप्राय द्या..