कृषि तांत्रिक संघटना जिल्हाध्यक्ष पदी एकनाथ सावंत यांची निवड ,उपाध्यक्ष निलेश जाधव, तर शारदा नाडेकर सचिव व बाळकृष्ण परब खजिनदार

कृषि तांत्रिक संघटना जिल्हाध्यक्ष पदी एकनाथ सावंत यांची निवड ,उपाध्यक्ष निलेश जाधव, तर शारदा नाडेकर सचिव व बाळकृष्ण परब खजिनदार

सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्र राज्य कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नवनिर्वाचीत कार्यकारिणीची नुकतीच निवडण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे कृषि विस्तार अधिकारी म्हणून हृषिकेश कुंभार पीठासन अधिकारी म्हणून होते. संघटना जिल्हा अध्यक्षपदी सावंतवाडी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत, सावंतवाडी विस्तार अधिकारी श्रीम. शारदा नाडेकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. दोडामार्ग कृषि अधिकारी नीलेश जाधव यांची उपाध्यक्ष पदी, खजिनदार पदी कुडाळ कृषि अधिकारी बाळकृष्ण परब यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य प्रतिनिधी म्हणून कणकवली कृषि विस्तार अधिकारी सुनील पांगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिजीत मदने (विस्तार अधिकारी, कणकवली), विनायक जाधव (विस्तार अधिकारी, मालवण), शशिकांत भरसाट (कृषी अधिकारी, वैभववाड, दिगंबर खराडे (कृषी अधिकारी, देवगड) यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील कृषि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन नवीन,कार्यकारिणीच्यावतीने अध्यक्ष एकनाथ सावंत यांनी दिले.

अभिप्राय द्या..