अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला..

अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला..

सिंधुदुर्गनगरी /-

अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करून मातृत्व लादल्या प्रकरणी एकाचा जामीन अर्ज आज विशेष जिल्हा न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला •आहे. नितीन चंद्रकांत गुरव (रा. पेंढरी-वरचीवाडी, ता. देवगड), असे संशयिताचे नाव आहे. याकामी सरकारी पक्षातर्फे अॅड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी संशयिताचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्याने लग्नाचे आमिष दाखवून त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत मातृत्व लादले. याबाबत संबंधित मुलीच्या बहिणीने मुंबई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध २४ ऑक्टोबर २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच हा गुन्हा विजयदुर्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याने आतापर्यंत जामिनासाठी तीन वेळा अर्ज केला. मात्र तिन्ही वेळा तो नामंजूर करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..