You are currently viewing जिल्हा बँकेला ईडीची चौकशी नाही विरोधकांकडून हेतुपुरस्कर बँकेची बदनामी केली जाते.;अध्यक्ष सतीश यांची माहिती..

जिल्हा बँकेला ईडीची चौकशी नाही विरोधकांकडून हेतुपुरस्कर बँकेची बदनामी केली जाते.;अध्यक्ष सतीश यांची माहिती..

ओरोस /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “ईडी”कडून कोणत्याही प्रकारची नोटीस बजावलेली नाही. मात्र माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा तो “मेसेज” फेक आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. दरम्यान आज दिवसभरात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीची नोटीस, असा मॅसेज असलेला एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही नोटीस ईडीडून बजावण्यात आली नसून अशा मॅसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष श्री. सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.

अभिप्राय द्या..