सिंधुदुर्गात १३ ते १६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज.;नागरिकांनी काळजी घ्यावी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गात १३ ते १६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज.;नागरिकांनी काळजी घ्यावी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गनगरी /-

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उद्या १३ ते १६ जुलैला तुरळक ठिकामी मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये.घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.विजेच्या खांबांपासून लांब रहावे.उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता,घ्यावी.आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..