वाडोस येथे खा.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल बँकेचे उद्घाटन..

वाडोस येथे खा.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल बँकेचे उद्घाटन..

जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे यांच्या आयोजन..

कुडाळ /-
खासदार मा. श्री.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेतर्गत कुडाळ तालुका सायकल बँकचे उद्घाटन रविवार दि. ११ जुलै, २०२१ रोजी सकाळी ११ वा. जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सायकल बँक अंतर्गत या हायस्कुल मधील १० विद्यार्थिनीना मोफत सायकल देण्यात आल्या. या कार्यक्रमाला भा.ज.पा. कुडाळ तालुका सरचिटणीस श्री. योगेश बेळणेकर,हायस्कुल मुख्याध्यापक श्री.सावंत सर,जन शिक्षण संस्था प्रतिनिधी श्री.महेश धुरी ,श्री.रमेश खरात तसेच श्री. सुरेश धुमक ,श्री.दिनेश सुभेदार , श्री.दीपक म्हाडगुत ,श्री.सागर जाधव, श्री.सिद्धेश धुरी ,श्री.नाना म्हाडगुत ,श्री कडव सर ,श्री.विजय चव्हाण तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.त्यावेळी मा.श्री.सुरेशजी प्रभू साहेबाना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..