ओरोस /-

ओरोस बुद्रुक गावात गुरूवार दिनांक 17/09/2020 ते 24/09/2020 पर्यत कोरोना प्रार्दुभावाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स व वैदयकिय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

ओरोस बुद्रुक गाव ग्रामिण व नागरी लोकवस्तीत एकवटले असुन ओरोस बुद्रुक गावामध्ये जिल्हयाची मुख्य कार्यालये आहेत. त्यामुळे संपुर्ण जिल्हयातुन किंबहुना जिल्हाबाहेरील व्यक्तिची ये-जा असते. अनलॉक प्रकिया सुरु झाल्यानंतर कोरोना प्रसार मोठया प्रमाणावर सुरु झाला आहे. ही साखळी तोडण्यासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांची सभा सरपंच श्रीम.प्रिती प्रकाश देसाई याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कोरोना कृती समिती, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पुढील निर्णय घेण्यात आले.

१.ओरोस मधील सर्व प्रकारची दुकाने गुरुवार दि. 17/09/2020 पासून गुरुवार दि. 24/09/2020 पर्यंत बंद राहतील.
२. मेडिकल व दवाखाना या वैद्यकीय सुविधा वगळण्यात आल्या आहेत.तरी सर्व व्यापारी व नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोरोना कृती समितीचे अध्यक्ष श्रीम.प्रिती प्रकाश देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page