नवी दिल्ली/-

आता फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनी ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या विक्रीपूर्वी आणि बिलीयन डेजच्या मोठ्या विक्रीपूर्वी सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट त्याच्या पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार आहे. याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार (Indirect Jobs) निर्माण होतील.
सध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी तो क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत असून त्यांना पुरवठा साखळी व्यवस्थापनाची माहिती देत आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे.

तसेच हॅंड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल. कारण याकाळात भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची आवश्यकता आहे.
Amazon देखील कर्मचाऱ्यांची मोठी गरज-सोमवारी Amazonने सांगितले की त्यांच्या ऑनलाइन ऑर्डर वाढत असल्याने आणखी 1 लाख लोकांना कामावर घेणार आहेत. अ‍ॅमेझॉनने सांगितले की नवीन कर्मचाऱ्यांना पार्ट टाईम आणि फुल टाईम कामाचे पर्याय असणार आहेत. यामध्ये पॅकिंग, शिपिंग आणि ऑर्डरची क्रमवारी लावण्यात मदत करायचे काम असेल. अ‍ॅमेझॉनने सांगितले की या नोकर्‍या हॉलिडे हायरिंग संबंधित नाहीत. Amazonने या वर्षाच्या सुरूवातीस 1 लाख 75 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.बेरोजगारांना प्रती महिना 15 हजार भत्ता द्या; राज्यसभेत मागणीAmazonला त्यांच्या 100 नवीन गोदामांमध्ये पॅकेज सॉर्टींग सेंटर आणि इतर सुविधांसाठी लोकांची गरज असल्याचं म्हटलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या गोदामावर देखरेख ठेवणारी एलिसिया बोलर डेव्हिस म्हणाली की डेट्रॉईट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि केंटकी येथे लुईसविले येथे कामगार शोधणे कठीण असलेल्या काही शहरांमध्ये कंपनीला $ 1000 पर्यंतचे बोनस देण्यात येत आहे. Amazonचा सुरुवातीचा पगार ताशी 15 डॉलर (1100 रुपयांपेक्षा जास्त) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page