जनतेच्या पैशातून कंगनाला वाय सुरक्षा कश्यासाठी;उर्मिला मातोंडकर

जनतेच्या पैशातून कंगनाला वाय सुरक्षा कश्यासाठी;उर्मिला मातोंडकर

मुंबई /-

कंगनाच्या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तोंड उघडले आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेकंगनाला दिलेल्या या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा सवाल तिने केला आहे.उर्मिलाने आज एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाचा समाचार घेतला. ‘या मॅडमना काय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देते? तुमच्या आमच्यासारखा माणूस जो ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. त्या करदात्यांच्या पैशातून हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली,हे कश्यासाठी, आणि ती सुरक्षा काय म्हणून दिली गेली?’ अशी विचारणाच उर्मिलाने केली आहे.

‘इंडस्ट्रीतल्या ड्रग माफियांची माहिती अंमली पदार्थ विभागाला देण्याचा दावा तिने केला होता. मुंबईसारख्या ‘भयाण’ ठिकाणी न येताही ती तू इंटरनेट, फोन, मेलवरून देऊ शकली असतीस. मग आलीस कशाला? चिथवायला, अशा शब्दांत उर्मिलाने संताप व्यक्त केला.

2 कोटींच्या भरपाईसाठी कंगना पालिका विरोधात हायकोर्टात अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर असून नुकसान भरपाई पोटी पालिकेने आपल्याला 2 कोटीची भरपाई द्यावी अशी मागणी करत अभिनेत्री कंगना राणावत हिने हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर 22 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे

अभिप्राय द्या..