फोंडाघाट पोलिस चेक पोस्टला अजित नाडकर्णी यांच्याकडून दोन फॅन भेट..

फोंडाघाट पोलिस चेक पोस्टला अजित नाडकर्णी यांच्याकडून दोन फॅन भेट..


वैभववाडी/-

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस विभाग आणि आरोग्य विभाग,शिक्षण विभागातील शिक्षक आपले दैनंदिन कामकाज सांभाळून कोरोना योध्याची भूमिका काटेकोरपणे पार पाडीत आहेत. मात्र सुविधांच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे.फोंडाघाट प्रवेशद्वारावरील चेकपोस्टवर पोलीस विभाग पत्र्याच्या चौकोनी बांधकामामध्ये तर प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी प्लॅस्टिक कागद चौफेर बांधलेल्या आणि पंचायत समितीकडून डोक्यावर फॅब्रिकेशन चे छप्पर बांधून देण्यात आलेल्या खुराड्यात ऊन, पाऊस,वारा-झेलत आपले काम चोख बजावत आहेत.त्यामुळे स्थानिक दातृत्वाचा मदतीतून- भेटीतून अत्यावश्यक सेवासाठी लागणारे साहित्य , ग्रामसेवक चौलकर यांच्या प्रयत्नातून स्वयंसेवी संस्थांच्या, देणगीदारांच्या मदतीतून पूर्तता केली जात आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून फोंडाघाट चेकपोस्ट वरील पोलीस व आरोग्य विभागासाठी येथील शितल एजन्सीचे अजित नाडकर्णी यांनी टेबल फॅन एक व सिलिंग फॅन एक भेट दिला.
यावेळी संदेश पटेल,निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर सावंत ,अजित नाडकर्णी,उत्तम रेवडेकर ग्रामसेवक चौलकर, सी. एच .ओ. विद्या रासम, पोलीस कर्मचारी, शिक्षक वर्ग- संजय सावंत, श्रीकृष्ण नानचे ,ज्ञानदेव आपोतीकर इत्यादी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..