मणेरी येथील संतप्त पुरग्रस्तांचा जल आंदोलन व अन्नत्याग आंदोलनाचा शासनाला इशारा

मणेरी येथील संतप्त पुरग्रस्तांचा जल आंदोलन व अन्नत्याग आंदोलनाचा शासनाला इशारा

दोडामार्ग /-

सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात तिलारी नदी आढळते ही नदी बारमाही वाहणारी तालुक्यातील मोठी नदी असून पावसाळ्यात तिलारी धरणाचा पाणीसाठा वाढल्याने धरणाचे पाणी तिलारी नदीला सोडण्यात येते यामुळे तिलारी नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते, शासन मात्र हाथ वर करून आपली जबाबदारी फेटाळून लावते यावर कोणत्याही प्रकारच्या पूर पूर्व उपाय योजना करत नसल्याने नदी काठचे गाव पाण्याखाली बुडले जातात ह्या गावांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होते, असाच दरवर्षी पाण्याखाली जाणार गाव म्हणजे मणेरी हा गाव गेली दोनवर्षे पाण्याखाली जात ह्या गावचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे गेली दोन वर्षे गावातील लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असून कुठेही एका टोकाला आपला जीव जवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी दोनवर्षे आपले घरदार सोडून स्थलांतरित करण्यात गेली परंतु शासनाला ह्याचे काहीही पडलेले नसल्याने शासन मात्र स्थलांतर करण्याच्या नोटीसी बजावत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाहीत असे बजावत आपली जबाबदारी फेटाळून लावते,आता देखील मणेरी वासीयांना स्थलांतरच्या नोटिसा काढत शासनाने आपली जबाबदारी भेटाळून लावल्याने मणेरी येथील पुरग्रस्तांन मध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे,संतप्त पूरग्रस्त मात्र आम्ही ज्याठिकाणी राहतो त्याच ठिकाणी राहुन तेथील परिस्थिती अनुभवणार मात्र स्थलांतर करणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला असून मात्र ह्या वेळी जीवित आणि वित्त हानी झाल्यास पूर्णतः शासन जबाबदार ठरेल असे देखील मनेरी येथील पूर ग्रस्थानीं म्हटले आहे,
स्थलांतरण व्हा असे दरवर्षी नोटिसा काढत शासन मात्र पूर ग्रस्थाना वाऱ्यावर सोडून देते पण नक्की स्थलांतरीत कुठे व्हावे याची मात्र सोय शासन करताना दिसत नाही गाव म्हटले की शेती, घर, पाळीव प्राणी अशा अनेक गोष्टी उपस्थित असतात मात्र स्थलांतर करण्याचे झाले तर नक्की कशा-कशाचे स्थलांतर करावे व नक्की कुठे स्थलांतर करावे यासाठी शासन मात्र कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करत नाही, स्थलांतराच्या नोटिसा काढल्याने स्थलांतर होत नाही तर त्यासाठी जागा उपलब्ध असावी लागते व माणसाप्रमाणे पाळीव प्राणी देखील ठेवण्याची सोय असावी लागते त्यातच पावसाळी हंगाम असल्याने राहण्यासाठी डोक्यावर छत असणे गरजेचे असते,अशा अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच पूरपूर्व नदीतील साचलेला गाळ काढणे गरजेचे असते या मात्र कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना शासन करताना दिसत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी शासनाला बारा दिवसांचा अवधी दिला असून अन्यथा जनआंदोलन व अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देखील मणेरी पूरग्रस्तांना दिला आहे.

अभिप्राय द्या..