You are currently viewing माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे..

मुंबई /-

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर आज ईडीकडून छापे टाकण्यात आले.सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान त्यांच्या घराभोवती सीआरपीएफची तुकडी करण्यात तैनात करण्यात,आल्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे छाप्या दरम्यान श्री देशमुख हे घरात नव्हते असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.या छाप्यात ईडीचे पाच अधिकारी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून घरातील कागदपत्रे फाईल आदींची तपासणी सुरू आहे. महिन्याभरापूर्वी त्यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता त्यानंतर आता ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या..