तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन…

तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन…

वेंगुर्ला /-

तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, ग्रामपंचायत उपसरपंच विकी केरकर, ग्रामपंचायत सदस्य संकेत धुरी,आकांक्षा मोरजकर, पेरपेतीन डिसोझा,संस्था अध्यक्ष उदय धुरी, विश्वनाथ धुरी, गुरुनाथ घाडी,कृती समिती उपाध्यक्ष केशव धुमाळ,
ग्रामसेवक दत्तात्रेय पवार,पोलिसपाटील निलेश पोळजी,आरोग्य सेवक विजय तळकर, शाळा मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर,शिक्षक रेडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रेगे,ग्रामपंचायत कर्मचारी विद्याधर जाधव, शांताराम मुळीक आदी उपस्थित होते.सदर कक्षासाठी युवा उद्योजक अंकुश गावडे २० हजार रुपये,प्रकाश रेगे १ हजार रुपये,सुनिल मोरजकर १ हजार रुपये इत्यादींनी
देणगी दिली.सदर देणगीदारांचे कोरोना कृती समितीने आभार मानले.

अभिप्राय द्या..